Ad will apear here
Next
विवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत
धुळे जिल्ह्यातील देवरे दाम्पत्याची मदत

मुंबई : सध्या असलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन धुळे जिल्ह्यातील कल्पेश आण‍ि प्रियांका देवरे या दाम्पत्याने विवाहावरील खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला अडीच लाख रुपयांची मदत केली आहे. दोन लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला. देवरे दाम्पत्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बोरीस (ता. जि. धुळे) येथील प्रगतिशील शेतकरी परशुराम भाईदास देवरे यांचे पुत्र कल्पेश आण‍ि उंभरे (ता. साक्री, जि. धुळे) येथील प्रगत‍िशील शेतकरी संजय काश‍िनाथ सोनवणे यांची कन्या प्रियांका यांचा विवाह ठरला होता. त्यावेळी वर-वधू आण‍ि दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी खर्चिक समारंभाचे आयोजन टाळण्यावर सहमती दर्शवली. साधेपणाने विवाह करून वाचवलेला पैसा राज्यातील सध्याच्या दुष्काळ निवारण कार्यासाठी मदत म्हणून देण्याचा निश्चय त्यांनी केला आणि नोंदणी पद्धतीने व‍िवाह केला.

कल्पेश आण‍ि प्रियांकासह त्यांच्या आई-वड‍िलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात चार जून २०१९ रोजी भेट घेऊन, दोन लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. या वेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील या कुटुंबीयांसमवेत उपस्थ‍ित होते. समाजासमोर घालून दिलेल्या या आदर्शाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नवदाम्पत्याचे, तसेच देवरे आण‍ि सोनवणे कुटुंबीयांचे अभ‍िनंदन केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZXICB
Similar Posts
‘ऑडिओ ब्रिज’मुळे मुख्यमंत्री, सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा व राज्य प्रशासन एकाचवेळी कनेक्ट मुंबई : ‘नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय.. दुष्काळाबाबत आपल्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आपणाशी संवाद साधत आहे.’ गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील सरपंचांच्या भ्रमणध्वनीवर हा आवाज कानी पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासन आणि राज्य
जगातील सर्वांत मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण मुंबई : महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी नदीवरील तेलंगण येथील जगातील सर्वांत मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण २१ जून रोजी होत आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तेलंगणचे मुख्यमंत्री के
राज्याच्या दुष्काळी भागात विविध उपाययोजनांना गती मुंबई : रोजगार हमी योजनेखाली (रोहयो) कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसांत संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून, यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने
‘दुष्काळाबाबत तत्काळ निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्या’ मुंबई : ‘राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावले उचलून जनतेला दिलासा द्यावा,’ अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून, त्यासोबत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language